Realme P4 Pro 5g: स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने बुधवारी भारतात आपल्या P Series मधील दोन नवीन मॉडेल्स सादर केले – Realme P4 5g आणि Realme P4 Pro 5g. या दोन्ही फोनमध्ये MediaTek आणि Snapdragon चिपसेट्सचा वापर करण्यात आला असून, हे Android 15 वर आधारित आहेत. Gaming वर विशेष लक्ष देणाऱ्या या फोनमध्ये शक्तिशाली Processor, उत्तम Camera आणि मोठी Battery यासारखी वैशिष्ट्ये आहेत.
Realme P4 5g आणि Realme P4 Pro 5g हे फोन Gamers साठी खास आहे. यात Qualcomm Snapdragon 7 Gen 4 Processor आणि नवीन HyperVision AI Chipset आहे, ज्यामुळे १०० हून अधिक Games मध्ये 144 FPS पर्यंत Gameplay शक्य आहे. याशिवाय, Sleek Design, 50-Megapixel AI Camera आणि High-Capacity Battery यामुळे हा फोन रोजच्या वापरासाठीही उत्तम आहे.
महाराष्ट्रात पावसाचा कहर! 8.5 लाख हेक्टर पिके उद्ध्वस्त, 10 जणांचा मृत्यू, पंचनामे कधी होणार?
या फोनच्या मुख्य Features बद्दल सांगायचे तर, यात 12GB RAM आणि 256GB Storage पर्यंत पर्याय आहेत. Snapdragon 7 Gen 4 Chipset सोबत Hyper AI Chipset AI Travel Snap आणि AI Snap Mode सारखी Features देते. Display 6.8-Inch AMOLED असून, 144Hz Refresh Rate आणि 6,500 Nits Peak Brightness आहे. यावर Corning Gorilla Glass 7i Protection आहे. Battery 7,000mAh असून, 80W Fast Charging ला सपोर्ट करते. Operating System Android 15 वर आधारित Realme UI 6 आहे. अतिरिक्त Heating हाताळण्यासाठी 7,000 Sq mm Cooling System आहे. Camera Setup मध्ये 50MP Primary Sensor OIS सह, 8MP Ultra-Wide Angle Lens आणि 50MP Front Camera आहे.
रिअलमी पी४ ५जी मध्ये 6.77-Inch AMOLED Display आहे, ज्याचा Refresh Rate 144Hz आहे. यात MediaTek Dimensity 7400 SoC आहे. RAM 6GB पासून 8GB पर्यंत आणि Storage 256GB पर्यंत आहे. Camera मध्ये 50MP Main Camera आणि 8MP Ultra-Wide Lens आहे. Battery 7,000mAh असून, 80W Fast Charging आहे.
Pricing बद्दल बोलायचे तर, Realme P4 Pro 5g, आणि Realme P4 5g ची सुरुवातीची Price 8GB RAM + 128GB Storage साठी ₹24,999 आहे. 8GB RAM + 256GB Variant ₹26,999 ला, तर टॉप मॉडेल 12GB RAM + 256GB ₹28,999 ला मिळेल. रिअलमी पी४ ५जी ची Price 6GB + 128GB साठी ₹18,499, 8GB + 128GB साठी ₹19,499 आणि 8GB + 256GB साठी ₹21,499 आहे.
कंपनीनुसार, हे Smartphones 27 ऑगस्ट 2025 पासून Flipkart, Realme.com आणि प्रमुख Offline Retail Stores वर उपलब्ध होतील. हे फोन भारतीय Market मध्ये Gaming आणि Performance साठी नवीन पर्याय देतात, ज्यामुळे ग्राहकांना Affordable Price मध्ये Premium Features मिळतील.