हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

लाडक्या बहिणींना मिळणार बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा…!

On: September 18, 2025 9:33 PM
Follow Us:
लाडक्या बहिणींना मिळणार बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...!

मुंबई (बातमीवाला): राज्यातील महिलांना आणखी एक पाऊल पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना उद्योग-व्यवसायासाठी १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली. यामुळे या महिलांना केवळ १५०० रुपयांच्या मासिक मदतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही, तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की महिला बचत गटांच्या माध्यमातून या महिलांना आर्थिक सहाय्य मिळेल. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींसाठी एक पतसंस्था सुरू करून जिल्हा बँकेच्या मार्गाने त्यांना हे बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. “आमच्या बहिणींना फक्त १५०० रुपयांवर अवलंबून राहू नये, त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ देऊन सक्षम करायचे आहे,” असे ते म्हणाले. या कर्जामुळे महिलांना उद्योग सुरू करून स्वावलंबी होण्याची संधी मिळेल आणि शासन नेहमी त्यांच्या सोबत उभे राहील.

Balika Samriddhi Yojana: मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च सरकार करणार; पहा बालिका समृद्धी योजना आहे तरी काय?

या निर्णयामुळे लाडकी बहिण योजनेचा विस्तार होईल आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण गती घेईल. गेल्या वर्षी लखपती दीदी योजनेअंतर्गत राज्यात २५ लाख महिलांनी लखपती दीदीची ओळख मिळवली असून, महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यंदाही तितक्याच संख्येत महिलांना ही ओळख मिळवून देण्याचे उद्दिष्ट असून, एकूण एक कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षाला किमान १ लाख रुपयांची कमाई करण्याची क्षमता निर्माण होईल, ज्यामुळे कुटुंब आणि समाजाच्या विकासाला चालना मिळेल.

Amol Dhanve

Amol Dhanve is an experienced journalist with over 2 years in the news field, specializing in agriculture, weather reporting, and the dairy business. He has covered monsoon patterns, bajar bhav, crop impact analysis, farmer-centric government schemes, and dairy industry trends, providing accurate and timely updates to help rural audiences make informed decisions in farming and dairy business operations.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

2 thoughts on “लाडक्या बहिणींना मिळणार बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा…!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!