Free AI Courses by Google: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. टेक कंपन्यांपासून ते बँकिंग, मार्केटिंग, शिक्षण, न्यूज आणि प्रॉडक्ट डिझाईनपर्यंत सगळ्या क्षेत्रात AI तज्ज्ञांची गरज वाढतेय. आणि त्यामुळे AI शिकण्यासाठी बाजारात खूप सारे कोर्सेस उपलब्ध झाले आहेत. त्यात काही कोर्सेस शिकण्यासाठी लाखोंचा खर्च करावा लागत आहे. पण इथे एक खास गोष्ट म्हणजे, या लेखात दिलेले कोर्सेस शिकण्यासाठी तुम्हाला खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत! गूगलने त्यांच्या ‘गूगल क्लाउड स्किल बूस्ट’ या व्यासपीठावर ८ मोफत AI कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. हे कोर्सेस फक्त काही तासांत पूर्ण होतात आणि त्यासाठी कोडिंग किंवा डेटा सायन्सचं विशेष ज्ञान असण्याची गरज नाही. चला, या कोर्सेसबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया.
Free AI Courses by Google: गुगलचे 8 मोफत AI कोर्सेस
१. जनरेटिव्ह AI ची ओळख
हा कोर्स फक्त ४५ मिनिटांचा आहे. यात तुम्हाला AI म्हणजे काय, ते नेहमीच्या मशीन लर्निंगपेक्षा कसं वेगळं आहे आणि गूगलचे टूल्स वापरून स्वतःचे AI अँप्स कसे बनवता येतात, हे समजेल. कस्टमर सर्व्हिस चॅटबॉट्सपासून ते जाहिरातींसाठी सर्जनशील गोष्टी बनवण्यापर्यंत, हा कोर्स लेखक, डिझायनर्स आणि धोरण बनवणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
२. लार्ज लँग्वेज मॉडेल्सची ओळख
हा एक तासाचा कोर्स आहे. यात तुम्ही लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLM) म्हणजे काय आणि प्रॉम्प्ट ट्यूनिंगने त्यांचे परिणाम कसे सुधारता येतात, हे शिकाल. गूगलचे LLM टूल्स कसे वापरायचे आणि Gemini किंवा ChatGPT सारख्या AI टूल्समधून चांगले परिणाम कसे मिळवायचे, याची माहिती मिळेल. स्मार्ट प्रॉम्प्ट्स बनवायला शिकण्यासाठी हा कोर्स खूप उपयुक्त आहे.
३. जबाबदार AI ची ओळख
हा कोर्स फक्त ३० मिनिटांचा आहे. यात जबाबदार AI म्हणजे काय आणि गूगलचे ७ AI तत्त्व काय सांगतात, हे समजावलं जातं. नेतृत्व, धोरण, मानव संसाधन किंवा सामग्री निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्यांना AI च्या नैतिक बाबी समजण्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे.
४. इमेज जनरेशनची ओळख
हा ३० मिनिटांचा कोर्स आहे. यात डिफ्यूजन मॉडेल्स कशी काम करतात आणि त्यांना Vertex AI वर कसं प्रशिक्षित केलं जातं, हे शिकवलं जातं. ब्रॅंडिंग, सोशल मीडिया, UI डिझाईन किंवा ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कोर्स खूप छान आहे.
५. अटेंशन मॅकेनिझम
हा ४५ मिनिटांचा कोर्स आहे. यात AI मॉडेल्स योग्य माहितीवर लक्ष कसं केंद्रित करतात, हे शिकवलं जातं. भाषांतर, सारांश तयार करणे किंवा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे तंत्र उपयुक्त आहे. दस्तऐवज व्यवस्थापन, संशोधन किंवा बहुभाषिक सामग्री हाताळणाऱ्यांसाठी हा कोर्स फायदेशीर आहे.
६. ट्रान्सफॉर्मर मॉडेल्स आणि BERT
हा ४५ मिनिटांचा कोर्स आहे. यात BERT आणि इतर ट्रान्सफॉर्मर मॉडेल्सची रचना आणि त्यांचा टेक्स्ट क्लासिफिकेशनसारख्या कामांसाठी वापर कसा होतो, हे समजावलं जातं. यातून तुम्हाला AI कसं काम करतं, याची सखोल माहिती मिळेल.
७. इमेज कॅप्शनिंग मॉडेल्स तयार करणे
हा ३० मिनिटांचा कोर्स आहे. यात डीप लर्निंग, एन्कोडर आणि डिकोडर वापरून इमेजसाठी कॅप्शन्स कशी तयार करायची, हे शिकवलं जातं. मीडिया, शिक्षण, प्रकाशन किंवा ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कोर्स उत्तम आहे.
BSF मध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांसाठी 3588 जागांसाठी मेगा भरती जाहीर; असा करा अर्ज!
८. Vertex AI स्टुडिओची ओळख
हा कोर्स २ तासांचा आहे. यात Vertex AI स्टुडिओ वापरून जनरेटिव्ह AI अँप्स कसे बनवायचे, याची संपूर्ण माहिती मिळते. प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग, मॉडेल ट्यूनिंग आणि अँप्स डिप्लॉयमेंट यांचा समावेश आहे. प्रॉडक्ट मॅनेजर, इनोव्हेशन लीड्स आणि स्टार्टअप संस्थापकांसाठी हा कोर्स खूप उपयुक्त आहे.
या कोर्सेसनंतर तुम्हाला गूगलकडून सर्टिफिकेट मिळेल, जे तुमच्या करिअरला नवी दिशा देईल. गूगल क्लाउड स्किल बूस्टवरील हे कोर्सेस नवशिक्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांसाठी तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही AI क्षेत्रातल्या नव्या संधींचा फायदा घेऊ शकता आणि तुमचं करिअर नव्या उंचीवर नेऊ शकता.
2 thoughts on “Free AI Courses by Google: गूगलच्या या 8 मोफत AI कोर्सेसमुळे तुम्ही बनू शकता टेक क्षेत्रातील तज्ज्ञ! फ्री मध्ये मिळत आहे ऍडमिशन…”