Bandage Hacks:बँडेजचे 6 आश्चर्यकारक उपयोग: जखमेव्यतिरिक्त रोजच्या अडचणी सोडवण्यासाठीही उपयुक्त! आपल्या घरातील प्रथमोपचार पेटीत बँडेज नेहमीच असते. बहुतेकांना वाटते की बँडेज फक्त जखमांवर लावण्यासाठी आहे, पण हे छोटेसे बँडेज आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर चटकन उपाय ठरू शकते. जखमांवर मलमपट्टी करण्यापलीकडे बँडेजचे असे अनेक स्मार्ट उपयोग आहेत, जे तुमचे आयुष्य सोपे करू शकतात. चला, जाणून घेऊया बँडेजचे हे सहा कमाल हॅक्स, जे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयुक्त ठरतील!
- नवीन फुटवेअरमुळे होणाऱ्या जखमांपासून संरक्षण
नवीन चपला, सँडल किंवा बूट घातल्यावर टाचांना किंवा बोटांना घासून जखमा होणे सामान्य आहे. यामुळे चालणेही कठीण होते. यावर उपाय म्हणजे, जिथे घासते त्या ठिकाणी पादत्राणांच्या आतल्या बाजूला बँडेज चिकटवा. यामुळे त्वचेला घासणे थांबेल आणि तुम्हाला आराम मिळेल. हा सोपा उपाय तुम्हाला नवीन फुटवेअर सहज वापरण्यास मदत करेल. - प्रवासातील मळमळ आणि श्वसनाचा त्रास दूर करण्यासाठी
बस, रेल्वे किंवा डोंगराळ भागात प्रवास करताना अनेकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होतो. अशा वेळी बँडेजवर औषधी तेलाचे (जसे युकेलिप्टस किंवा पुदिन्याचे तेल) काही थेंब टाकून ते मनगटावर चिकटवल्यास मळमळ थांबण्यास मदत होते. तसेच, जर घसा दुखत असेल किंवा नाक बंद झाले असेल, तर बँडेजवर तेल लावून घशावर किंवा नाकाजवळ लावल्यास श्वास घेणे सोपे होते. - कपड्यांशी संबंधित अडचणींसाठी उपाय
मुलींना स्टायलिश दिसण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन्सचे कपडे घ्यावे लागतात, पण कधीकधी कपड्यांच्या चुकीच्या फिटिंगमुळे अडचण येते. जर आतल्या कपड्यांच्या पट्ट्या दिसत असतील, तर त्या बँडेजने त्वचेला चिकटवून लपवता येतात. तसेच, लहान स्कर्ट किंवा ड्रेस वारंवार उडत असेल, तर बँडेजच्या साहाय्याने ते मांडीला चिकटवून जागेवर ठेवता येते. यामुळे तुम्हाला आत्मविश्वासाने फिरता येईल. - चार्जर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संरक्षण
मोबाईल किंवा लॅपटॉपच्या चार्जरच्या तारा वारंवार वाकल्याने तुटतात, विशेषतः टोकाजवळ. यापासून संरक्षणासाठी, बँडेज गोल करून तारेच्या त्या भागावर चिकटवा, जिथे ती सहसा तुटते. यामुळे तार मजबूत राहते आणि चार्जरचे आयुष्य वाढते. हा उपाय तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. - सौंदर्याशी संबंधित समस्यांसाठी उपाय
ओठ फुटण्याची समस्या अनेल तर रात्री झोपताना बँडेजवर व्हॅसलीन किंवा मॉइश्चरायझर लावून ओठांवर चिकटवा. सकाळी तुमचे ओठ मऊ आणि निरोगी दिसतील. तसेच, डोळ्यांचा मेकअप करताना आयलाइनर किंवा आयशॅडो लावण्यासाठी मार्गदर्शक हवे असल्यास, बँडेजची पट्टी डोळ्यांजवळ लावून त्याचा वापर करता येतो. यामुळे मेकअप परफेक्ट लागतो. - दागिन्यांचे व्यवस्थापन
लांब हार किंवा दागिने व्यवस्थित बसवायचे असतील, तर बँडेजच्या छोट्या तुकड्याने त्यांना गळ्यात किंवा योग्य ठिकाणी फिक्स करता येते. तसेच, जर दागिन्याचा एखादा टोकदार भाग त्वचेला टोचत असेल, तर त्या ठिकाणी बँडेजचा छोटा तुकडा चिकटवल्यास त्वचेचे नुकसान टाळता येते. यामुळे दागिने घालताना आराम मिळतो.