हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

वळती येथे आदित्य धनवे यांचा अनोखा उपक्रम : शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला वाढदिवस!

On: January 22, 2026 5:29 PM
Follow Us:
Aditya dhanve birthday shaley sahitya watap

वळती (बातमीवाला): वाढदिवस साजरा करण्याच्या नवनवीन कल्पना आजकाल सोशल मीडिया वर पाहायला मिळत आहेत, पण काही जण मात्र या दिवसाचा उपयोग समाजासाठी करतात. असाच एक प्रेरणादायी उपक्रम वळती गावातील आदित्य धनवे पाटील या युवकाने राबवला. आपल्या जुन्या शाळेत जाऊन त्याने विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप केले.

आदित्य हा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी. “ज्या शाळेत मी शिकलो, त्या शाळेला मीही काही तरी देणे लागतो,” या विचाराने प्रेरित होऊन त्याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला. बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शाळेत हा सोहळा पार पडला. आदित्यने विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रबर अशा गरजेच्या शालेय वस्तूंचे वाटप केले.

सध्या तरुणाई वाढदिवस म्हटले की केक, फटाके आणि पार्टी यातच रमते. पण आदित्यने या ट्रेंडला बाजूला सारून शाळेतील लहान मुलांना मदत करण्यावर भर दिला. शक्य तितक्या वस्तू घेऊन तो शाळेत आला आणि प्रत्येक मुलाच्या हातात त्या दिल्या. मुलांच्या चेहऱ्यावर दिसलेले ते निरागस हास्य, डोळ्यातील चमक आणि आनंद पाहून आदित्यचेही मन भरून आले.

आदित्यने डी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि सध्या तो बी. फार्मसी करत आहे. अभ्यासाबरोबरच तो सामाजिक कार्यातही सक्रिय असतो. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक आणि आदित्यचे मित्र उपस्थित होते. गावकऱ्यांनीही त्याच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले.

Raj Dhanve

हे गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. बँकिंग, फायनान्स, गुंतवणूक, नोकऱ्या, सरकारी धोरणे, योजना, राजकारण आणि ब्लॉगिंग या विषयांवर ते सातत्याने लिहितात. बातमी फक्त सांगणं नव्हे, तर तिचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय होतो हे समजावून सांगणं, हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. अचूक माहिती, विश्वासार्ह स्रोत आणि निष्पक्ष मांडणी यावर त्यांचा भर असतो, जेणेकरून वाचकांना योग्य निर्णय घेता येतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!