हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

जिल्हा शिक्षक गौरव कार्यक्रमात रफीक खान युनूस खान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

On: October 18, 2025 8:09 PM
Follow Us:
जिल्हा शिक्षक गौरव कार्यक्रमात रफीक खान युनूस खान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

बुलढाणा (बातमीवाला): बुलढाणा जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा शिक्षक गौरव कार्यक्रमात १५ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते श्री रफीक खान युनूस खान यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्यात आली.

श्री रफीक खान युनूस खान हे तराडखेड येथील उर्दू उच्च प्राथमिक शाळेत विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करण्यासाठी, समाजाप्रती असलेल्या तळमळीमुळे, सकारात्मक दृष्टिकोनामुळे, विद्यार्थिप्रिय स्वभावामुळे आणि आदर्श व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. भाऊ अनीस खान युनूस खान (सेवानिवृत्त विषय शिक्षक, धाड), रईस खान युनूस खान (विषय शिक्षक, देऊळघाट), संपूर्ण खान कुटुंब देऊळघाट, मुख्याध्यापक शे. नईम अब्दुल्ला, म. शकीब सर, जमील शाह सर, श्री. सुभाष इंगळे सर (उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उर्दू मराठी शाळा तराडखेड), एम. एम. शेख मुख्याध्यापक, अर्शद खान, तौफिक खान, शेर ए हिंद ब्रिगेडचे अध्यक्ष अल्ताफ मुमताज खान, तसेच मराठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, दोन्ही शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्या आणि धामणगांव केंद्रातील शिक्षण परिवाराने श्री रफीक खान यांचे मनापासून अभिनंदन केले. त्यांनी त्यांच्या भावी शैक्षणिक कारकिर्दीत असेच विकासोन्मुख कार्य सुरू ठेवावे, अशी शुभकामना दिली.

Raj Dhanve

हे गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. बँकिंग, फायनान्स, गुंतवणूक, नोकऱ्या, सरकारी धोरणे, योजना, राजकारण आणि ब्लॉगिंग या विषयांवर ते सातत्याने लिहितात. बातमी फक्त सांगणं नव्हे, तर तिचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय होतो हे समजावून सांगणं, हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. अचूक माहिती, विश्वासार्ह स्रोत आणि निष्पक्ष मांडणी यावर त्यांचा भर असतो, जेणेकरून वाचकांना योग्य निर्णय घेता येतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!