हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

सरकारी नोकरीची मोठी संधी; सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामध्ये ७६ पदांसाठी नवीन भरती

On: October 14, 2025 5:01 PM
Follow Us:
nashik kumbh mela recruitment

नाशिक (बातमीवाला): सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयारी करणाऱ्या प्राधिकरणाला आता पूर्णवेळ आयुक्त मिळाल्यामुळे सर्व कामांना वेग येणार आहे. राज्य सरकारने यासाठी स्वतंत्र ७६ पदांच्या निर्मितीला (nashik kumbh mela recruitment) नुकतीच मान्यता दिली आहे. यापैकी ५२ पदे नियमित भरली जातील, तर उरलेली २४ पदे बाह्य यंत्रणांच्या माध्यमातून पूर्ण केली जातील. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त शेखर सिंग यांनी प्राधिकरणाच्या आयुक्तपदाचा अलीकडेच पदभार हाती घेतला आहे. याशिवाय मंत्रालयातही एक स्वतंत्र कुंभमेळा कक्ष उभारण्यात येणार असल्याने २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता अधिक गती मिळेल.

प्राधिकरणाच्या आयुक्तपदी शेखर सिंग यांची नियुक्ती झाल्यानंतर सरकारने या संस्थेसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ७६ नव्या पदांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. यात नियमित ५२ पदांसह २४ पदे बाह्य स्रोतांद्वारे भरले जाणार आहेत. नियमित पदांसाठी प्रतिनियुक्ती, निवृत्त अधिकाऱ्यांकडून किंवा इतर पद्धतीने नियुक्त्या केल्या जातील, तर कंत्राटी पदांसाठी थेट जाहिराती किंवा मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजन्सींच्या मदतीने भरती प्रक्रिया राबवली जाईल. मंत्रालय स्तरावर स्वतंत्र कक्षाची व्यवस्था झाल्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सर्व कामांना खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने विशेष कायदा करून एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम काम पाहत आहेत, तर आयुक्त म्हणून शेखर सिंग यांची नियुक्ती झाली आहे. सुरुवातीला महापालिका आणि संबंधित सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने काम सुरू करण्यात आले होते, पण प्राधिकरणाकडे स्वतंत्र मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी पदनिर्मितीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने कुंभमेळ्याच्या तयारीला मोठा आधार मिळेल.

Raj Dhanve

हे गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. बँकिंग, फायनान्स, गुंतवणूक, नोकऱ्या, सरकारी धोरणे, योजना, राजकारण आणि ब्लॉगिंग या विषयांवर ते सातत्याने लिहितात. बातमी फक्त सांगणं नव्हे, तर तिचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय होतो हे समजावून सांगणं, हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. अचूक माहिती, विश्वासार्ह स्रोत आणि निष्पक्ष मांडणी यावर त्यांचा भर असतो, जेणेकरून वाचकांना योग्य निर्णय घेता येतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!