हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

चिखलीत या ठिकाणी लवकरच उभे राहणार ‘पोलीस पाटील भवन’; वाचा सविस्तर

On: September 19, 2025 11:40 AM
Follow Us:
चिखलीत लवकरच उभे राहणार ‘पोलीस पाटील भवन’

चिखली (बातमीवाला): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नांमुळे चिखली शहरात ‘पोलीस पाटील भवन’ उभारण्याचा शुभारंभ भूमिपूजनाने झाला.

प्रभाग क्रमांक 5 मधील चिखली पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे 50 लाख रुपये खर्चून हे अत्याधुनिक भवन उभारले जाणार आहे. हे भवन पोलीस पाटील, सरपंच आणि तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांसाठी अत्यंत सोयीचे ठरणार आहे.


चिखली जाफ्राबाद रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक हैराण; शिवसेना विध्यार्थी सेने कडून ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी

या प्रसंगी बोलताना आमदार सौ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “पोलीस पाटील हे गाव पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्थेचे पहिले शिलेदार आहेत. त्यांच्या कार्यामुळे गावात शिस्त, शांतता आणि समन्वय कायम राहतो. आजपर्यंत त्यांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी आणि कार्यक्षमतेसाठी हे ‘पोलीस पाटील भवन’ उभारले जात आहे. हे भवन फक्त एक सरकारी इमारत नसून, पोलीस पाटील बांधवांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरेल.”

या भव्य सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रतापसिंग राजपूत, ठाणेदार श्री. भूषण गावंडे, श्री. संजय गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), श्री. रफिक शेठ, श्री. सागर पुरोहित (शहराध्यक्ष, भाजप), श्री. मिलिंद इंगळे यांच्यासह पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raj Dhanve

हे गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. बँकिंग, फायनान्स, गुंतवणूक, नोकऱ्या, सरकारी धोरणे, योजना, राजकारण आणि ब्लॉगिंग या विषयांवर ते सातत्याने लिहितात. बातमी फक्त सांगणं नव्हे, तर तिचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय होतो हे समजावून सांगणं, हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. अचूक माहिती, विश्वासार्ह स्रोत आणि निष्पक्ष मांडणी यावर त्यांचा भर असतो, जेणेकरून वाचकांना योग्य निर्णय घेता येतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!