Soybean Crop Loss: गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून, 8 लाख 51 हजार 110 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांतील पिके पाण्याखाली गेली आहेत. बुधवारीही पावसाचा जोर कायम असल्याने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू होऊ शकले नाहीत. दरम्यान, दरड कोसळणे, पूर आणि इतर दुर्घटनांमुळे एकाच दिवसात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, 1 ते 18 ऑगस्टपर्यंत राज्यात 8 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मूग, सोयाबीन, उडीद, मका, ज्वारी आणि फळपिकांचे 2 लाख 85 हजार 543 हेक्टरवर नुकसान झाले आहे. कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर आणि उमरी या तालुक्यांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर आणि मानोरा तालुक्यांमध्ये 1 लाख 64 हजार 557 हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, 246 हेक्टर जमीन पूरामुळे खरवडून गेली आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप करत सदस्यांनी स्वत. सह ग्रामसेवकास घेतले कोंडून… धाड ग्रामपंचायत मधील घटना
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, बाबुळगाव, मालेगाव, मोहगाव आणि यवतमाळ तालुक्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि फळबागांचे 80 हजार 969 हेक्टरवर नुकसान झाले आहे. अकोला आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोलीत हळद आणि कापसाचे पिक उद्ध्वस्त झाले आहे, तर अमरावतीसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये संत्रा बागांना फटका बसला आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या आणि पूर येण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाड पडल्याने एकाचा मृत्यू आणि एक जण जखमी झाला. नांदेडमध्ये पुरात वाहून गेल्याने चार जणांचा, मुंबईत भिंत पडल्याने दोन जणांचा, सिंधुदुर्गात बुडून दोघांचा आणि रायगडमध्ये दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या संकटाला तोंड देण्यासाठी राज्यात एनडीआरएफचे 18 आणि एसडीआरएफचे 6 पथके तैनात करण्यात आली आहेत.
लग्नाचे आमिष दाखवत तिचे फोटो काढून तिला…! कधी त्याच्या घरात तर कधी त्याच्या कारमध्ये वारंवार…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांतील 78 तालुक्यांमध्ये पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
3 thoughts on “महाराष्ट्रात पावसाचा कहर! 8.5 लाख हेक्टर पिके उद्ध्वस्त, 10 जणांचा मृत्यू, पंचनामे कधी होणार?”